पान:बाळमित्र भाग २.pdf/१९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० बाळमित्र. तां कसा रंग आहे ? तुझी पाठ म्यां भुईस लावली असे वाटते. लात्या-(बळ करून उठावयास पाहतो.) अग आई, शिवराम्या, गचांडी सोडून माझे छातीवरून ऊठ, नाही तर मी मरतों आतां. शिव- अगोदर तूं आपल्या अपराधाची क्षमा मागून र घे, झणजे सोडीन. तात्या- (तापून ह्मणतो.) अरे जा, कश्यी क्षमा. तूं सोडतोस की नाही ? शिव०- अशाने मी सोडावयाचा नाही. त्वां सर्व मंड. ळीचा अनादर केला आहे, ह्यासाठी सर्वांपुढे नाक घांस, चुकलों मण, तोंडांत मारून घे, तर सोडतो. तात्या- बरें, बाबा, तूं ह्मणतोस तर करतो शिव०- मातक्यान जर असें करशील तर तुला आ- मी तळघरांत कोंडून टाकू, ह्मणजे तंटाच उरकेल. ( तान्यास उठू देतो, मग तो रागावला असे पाहून भ्यास ह्मणतो. ) इतकें रागें भरण्याचे कारण नाही, प्रथम तुजकडूनच आगळीक झाली. कावेरी- ( मथुरेस एकीकडे नेऊन ह्मणते ) तुझा भाऊ इतका धैर्यवान आहे हे माझे लक्षांत नव्हते. मथुरा- तो सिंहासारखा धैर्यवान आहे, तरी तो कधी कोणाशी कज्जा करीत नाही ह्या गांवांत ह्या- सारखा मुशीळ मुलगा दुसरा कोणी नाही. (सर्व