पान:बाळमित्र भाग २.pdf/१९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लपंडाव. १८५ मंडळीस ह्मणते.) आतां उगीच कां खोळंबतां । कांहीं तरी खेळ काढा. पारख्यांनो, तुमच्या मनां- त काय खेळावयाचे आहे ९ । व०पा.- ते बायकांनीच ठरवावें. (तात्या वडीलपारख्यास व शिवरामास वांकोल्या दाखवितो.) दुगा- पहा, माझ्या शिवरामाच्या डोळ्यांत कसे पा- णी आहे तें! इतर मुलांनी ह्याचे शहाणपणाचा कित्ताच घ्यावा ! बरें तर, आतां आझी घरकुलांत भातुकली खेळू. तुह्मांला तर बुदबळांचा खेळ भारी आवडतो. चला, उठा माझे गड्यांनो, सर्वांनी मा- झ्या खोलीत यावें. तात्या- काय, तुझी सारे मला एकट्याला सोडून जातां शिव०- नाही नाही, मी तुज करितां येथे राहतो. पण मी कदाचित् बाहेर गेलो तर लौकरच येईन. तात्या- तूंही जातोस तर, ब्वा, मी काही दुसन्याचे घरांत एकटा राहणार नाहीं; मला भय वाटते. अंक २. प्रवेश १. शिवराम आणि तात्या. तात्या- मी तुजबरोबर आलो ह्याचे कारण असें आ-