पान:बाळमित्र भाग २.pdf/१९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ बाळमित्र. कावेरी- शिवराम जर तात्याला येथून काढून लाव- ण्याची काही युक्ति योजील तर आनांवर त्याचा फार उपकार होईल, तो ह्या ठिकाणी असल्याने आह्मांस कद्धी चैन पडणार नाही. दुर्गा- मला असे धोरण दिसते की, शिवराम तात्यास अमर्याद शिक्षा करील. व.पा.- असे कसे होईल? शिवराम जर तान्याची तशी खूप था करील, तर त्या योगेंकरून त्याला शिकविल्यासारिखें होईल. मग आपल्या मुलास चां- -गल्या चालीचा उपदेश मिळाल्यामुळे शिवरामाची युक्ति ऐकून तात्याचा बाप फार संतोष पावेल, अ. से मला वाटते. शिवरामासारखा तात्या असता, तर त्याचा बाप त्याकरतां आपलें अर्धे द्रव्य संतो- बाने खर्च करता. मन- दुर्गा, तूं आपल्या भावाच्या युक्तीस विघ्न करूं. नको. दुर्गा- पण मने, माझा स्वभाव अंमळ प्रखर आहे, आतां मी येथें तुह्मांमध्ये मुख्य असतां आईस वा. ईट वाटेल असें काम इकडे होऊ देणार नाही. मन- त्याच्या मनांत आहे तसे त्याला आजचा दिव- स करूंदे, ह्याचा अन्याय आह्मी आपल्या आंगाव- र घेऊ. शिव- ( आनंदाने हंसत येतो. ) तात्या आतां के. व्हां का येईना; त्याला खेळावयास घेण्याकरिता