पान:बाळमित्र भाग २.pdf/२०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ बाळामित्र. तात्या- (हळूच ह्मणतो.) बरे तर गड्या, तूं पाह- शील मी त्यास कसा बारीक चिमटा घेतों तो, अ. सा की, रक्तच निघेल. (शिवराम तात्याचे डोळे बांधून वरकड सर्व मुलांस खोलीतून बाहेर जाव. याची खूण करितो, ती दिवा विझवून दुसरे खो- लीत जातात. दिवे विझाल्या नंतर मोतदार तो- डास काळे लावून, वर चुन्याचे ठिपके देऊन, डोईस मेंढराच्या लोकरीची टोपी घालून, फाटक रकटें नेसून, हातांत टेंभा घेऊन दाराजवळ येतो, शि- वराम त्याला तेथेच उभे रहावयाची खुण करितो.) शिव.- (तात्यास खोलीचे मध्यभागी उभे करून विचारतो.) तुझे बापाचे पागेंत किती घोडे आहेत तात्या- तीन, एक काळा, एक तांबडा, आणि एक पांढरा. शिव०- अरे, मुलांनो, आतां पहा कशी मौज होईल ती, तंवर तुह्मी आप आपल्या जाग्यावर उभीरहा. (लटके पर नेटकें बोलून ह्मणतो. तात्या तूं तीन वेळां फीर, जो कोणी हातांत सांपडेल त्यास ब- ळकट धर. ( तात्या फिरूंलागल्यावर शिवराम शि- ग घेऊन येतो, व मोतद्दारास घागरमाळा वाजवाव- याची खुणेने आज्ञा देतो, मग आपण बोलतो. ) राक्षस आलारे आला, पळ तात्या, जीवघेऊन प- ळ. (मग मोठा गलबला करून दार लावितो, आणि मोतद्दाराचे पाठीमागे लपून शिंगांतून शब्द काढून