पान:बाळमित्र भाग २.pdf/२०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९९ लपंडाव. बोलतो. ) कायरे तूं माझें द्रव्य घ्यावयास आलास काय? तात्या-( भयानें लटलट कांपतो, आणि घाबरून डो- ळ्यावरचे फडके काढावयास विसरतो. आणि मो. ख्याने किंकाळी फोडून बोंब मारितो. ) अरे शिव- रामा, अरे पारख्यानों, धांवा, लौकर या, माझ्या उ- रावर राक्षस बसला. शिव०- (शिंगाचे आवाजांतून ह्मणतो. ) त्या सर्वांस मी भय दाखवून पळविलें, आतां तूं डोळ्यावरचे फडकें काढून माझे तोंड पहा. तान्या डोळ्यावरचे फडके न काढितां भय पावन हातांनी बळकट तोंड झांकतो; जसा जसा राक्ष- स पुढे येतो तसतसा तो मागे हटतो.) शिव०- अरे काठ तोंडावरचा रुमाल ! ऐकतोस की नाही ९ (तात्या थरथर कांपत कांपत डोळ्यावरचा रुमाल काढितो, परंतु डोळे उघडून पहावयास भितो; शेक्टी राक्षसास पाहतांच मोठ्याने किंकाळी फोडतो, आणि अगदी गर्भगळित होऊन जागचे जागी थिजून राहतो; मग इकडे तिकडे फिरून दा- राजवळ येतो; दार गच्च लावलेले पाहून पायांत पाय गुंतून तोंडघशी पडतो, आणि भयामुळे त्याचे तोंडाकडे न पाहतां भुईत मान घालून बसतो.) शिव०- तूं काय माझे हातांतून पळून जावयास पा. हतोस काय १ .