पान:बाळमित्र भाग २.pdf/२०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. तात्या- ( भयाने बोबडी वळली आहे, ह्मणून गुंतत गुंतत बोलतो.) मी काही तुमचा अन्याय केला नाही; मी कधी तुमचे द्रव्यही नेलें नाहीं. शिव- त्वां कधीच अन्याय केला नाही काय ९ र. स्त्यांत येणारे जाणारे मनुष्यांचे आंगावर धूळ को- णरे टाकतो ९ आणि लोकांची पागोटी आंकडीने कोणरे उचलीत असतो ? कुत्री चिमण्या ह्यांचे हा- त पाय कोण मोडीत असतो. लहान पोरांस पाडा- वयाकरितां माझ्या खोलीत घडवंची कोणीरे अणू- न ठेविली १ असे असे अपराध तुजकडून काहीच घडले नाहीत काय ? आणि मुलांस भेडावायासारी तुजजवळ आतां मुखवटा नाहीरे ? तात्या- महाराज, तुह्मी ह्मणतां इतकेंही खरेंच आहे; आतां माझ्या अपराधाची क्षमा करावी; मी आप- ल्या आईबापांचा एकुलताएकच आहे; आजपासून असें करणार नाही. शिव० तुझें बोलणे खरें कशावरून : "ह्यास जामीन कोण आहे? तात्या- तुझी जी मुलें आतां पळवून लाविली त्यांना आणा, झणजे ती जामीन होतील. शिव- तूं खरेंच बोलतोस तर माझ्या हातावर हात मार. तात्या- नाहीं महाराज, मी खरेंच सांगतों. शिव.- बरें तर, आतां मी तुला सोडितों, पण खब-