पान:बाळमित्र भाग २.pdf/२०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लपंडाव. २०३ म्यां सिद्धीस जाऊ दिला नाही. पहा पाहिजेतर ह्याजजवळ एक मुखवटा आहे, तो ह्याने काढावा. राम- (तात्यास ह्मणतो,) कायरे १ खरेच कायरे हैं ? तात्या०- (तो मुखवटा रामरावापुढे टाकितो.) आतां माझ्याने बोलवत नाही, हा मुखवटा घ्या रावजी. राम- तर मग तुला आतांची योग्य शिक्षा झाली. कावेरी- आमी दुर्गाबाईपासून मागून घेतले होतें की, शिवराम तात्याची जी थट्टा करील ती करूंद्या. तर ही त्याला बरीच अद्दल घडली. मन- अगोदर तो आमची जी थट्टा करणार होता ती जर तुझांस समजली असती तर मग. राम-कायरे तात्या, तूं प्रथमारंभी आजच आलास- ना ९ आणि त्वां अशी पुंडाई मांडली १ अरे मुलीं- ची मर्यादा ठेवून खेळावें तें यकून त्यांची थट्टा क. रणार होतास काय ? निघ येथून; जा आपल्या घरास, जर का आजपासून तुला माझे पोरां बरो- बर खेळतांना पाहिले, तर मी मुलाजा करणार ना- हीं; कान उपटून हातावर देईन. म्यां तुला हांकू- न लावले हे ऐकून तुझा बाप तुझ्या अपराधाचा चांगली शिक्षा करील; जा कसा येथून, तोंड दाख- वू नको, ( तात्या लाजून निघून जातो.) मुलांनो, तुझी आजपासून अशी कोणाची वाईट थट्टा करी- त जाऊ नका; कदाचित' कोणी तुमचा कसाही जरी अपराध केला तरी असा खेळ खेळत जाऊं