पान:बाळमित्र भाग २.pdf/२१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. नका; लहान पोर एकदा भेदरले झणजे प्राणच सोडील; ह्याकरितां कोणी वाईट काम करावयास ज- र इच्छील, तर त्याशी नम्रपणानेच वागले पाहिजे, आणि त्याचे वडे काढणे झाले तर सुरीतीच्या वा. टेनेच काढावे. आजपासून तुमी पक्की आठवण ठेवा, आणि तात्याची जसी थटा केली तशी दुसन्याची थहा कधी करू नका, ह्याविषयी कानास खडा ला- वून घ्या; बरें तर बरें, नाही तर तो आणि तुझी प्राणास मुकला होता, असली थट्टा कोणी करतो की काय ? आज देव बऱ्यावर होता ह्मणून बरें झालें. रामा मुलगा. रामा ह्मणून एक चार वर्षांचा मुलगा होता; तो मुळचा कांहीं जातीचा ब्रात्य नव्हता, पण त्याचे आ- ईने जरबेंत न धरितां स्वेच्छेप्रमाणे त्यास व दिले; ह्मणून तो छांदिष्टपणा करूंलागला. बापानेही मनांत आणले की, जर आतां आपण ह्यास मागितलेली वस्त देत नाही तर हा रडरडून जिवाचा आकांत करील, असे समजून त्यानेही त्या पोराचा फारच लाङ चा. लविला, तेणेकरून तो पोर फारच वेडावून नाना छं. द करूं लागला. रामाचे छंद पुरवायाजोगती त्याचे आईबापांचे आंगी शक्ति नव्हती, कारणकी त्यांचा