पान:बाळमित्र भाग २.pdf/२११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामा मुलगा. २०५ हातावरचा संसार, पदरी गरीबी, ह्या मळे मागितले. ली वस्त त्यास कधी मिळे कधी न मिळे; असें होतां होतां तो मूल कांहींकां दिवसांनी अतिशयित हट्टी होऊन आईबापांशी भांडूलागला. जे न मागावयाचें तेंच मागावें, तें आईबापांनी नदिले तर लागलेच मो- ख्या क्रोधास चढून आंगरखा टोपी वगैरे जे काय आं. गावर असेल तें फाडून तोडून यकावें. आईबापांनी एखादी शिकवणीची गोष्ट सांगितली तर त्याने तिचे उ- लटे करावें. अशी त्याची दुष्ट वागणूक पाहून त्याचे आईबापां- स अत्यंत दुःख झालें. त्याची आई असें ह्मणे, मी अगोदर फार आशा ठेवली होती की, हा पोर चांगला सुशील सद्गुणी नि- वडेल, आणि ह्याचे मनांत वागेल की, तीर्थरूपमातोश्री. नी माझ्या बाळपणी मजकरितां फार खस्ता खाल्ली आहे, तर आपणही त्यांस वृद्धापकाळी मुख द्यावें, असें मनांत आणून पुढे आमचा काही सांभाळ करील, तें कांहीएक नहोतां उलटा दुःखास मात्र कारण झाला. म बापही ह्मणे की, हा बेटा वंशांत लाजलावणा निघाला. ह्याच्या बऱ्यावर कोणी नाही; हा एखादे दिवशी चोरी मारीत सांपडून मुळावर जाईल. ह्या क- रितां ईश्वर करोकी, असा समय येण्याचे अगोदर माझे डोळे झांकोत, ह्मणजे बरें. m