पान:बाळमित्र भाग २.pdf/२१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०६ बाळमित्र. अशा काळजीमुळे तो गृहस्थ झुरणीस लागला, आणि दिवसें दिवस त्याची शक्ति क्षीण होऊ लागली; अन्नोदकावरची वासना देखील बंद झाली; पूर्वी प्रमाणे कामकाज करीत असतां त्याचे अंतःकरण सुप्रसन्न रा. हीना; रामाच्या द्वाड स्वभावाची तो वारंवार चिंता करी; रात्रंदिवस कसे होईल काय होईल ह्याकडे लक्ष्य; अ. सा त्यास मोठा दृद्रोग लागला, तेणेकरून त्याचे शरी. र रुश होऊन अस्थींचा पंजर मात्र राहिला. त्याचे शरीर अगदी काळे ठिकर पडले. एके दिवशी तर तो फारच औदासिन्य आणि खे. द पावून बाजेवर पडला होता, तो त्याच्याने खाली उतरून येववेना; इतकी अवस्था झाली तथापि त्यावि. षयीं रामाच्या मनांत कांहीं एक वागले नाही, आणि तो नित्याप्रमाणे आईजवळ फराळास मागू लागला; तेव्हां आई ह्मणाली की, बाबा, तुला फराळाचे करून घालावयास माझ्याने उठवत नाही. तेव्हां रामा रुसला, ह्मणून त्याचे आईस फार वाई- ट वाटून रडू आले; बापानेही मोठ्याने मुसकारे टाकि. ले. देतील ह्मणून अंमळ दम खाऊन रामा उभा राहि- ला; शेवटी त्याचे मनांत आले की, कोणी उठत नाहीं तर आतां आपणच करून खावें; असा निश्चय करून शेजारणीचे घरी विस्तव मागावयास गेला, तो त्या घरची मुलगी दार उघडावयास आली, तिनें रामास पाहतांच ह्याचे आचरणावरून कपाळास आंठ्या घातल्या, आणि