पान:बाळमित्र भाग २.pdf/२१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामा मुलगा. २०७ रागें भरून उद्धटपणानें बोलली की, तूं कशा करितां 3 आमचे येथें आलास १ रामा ह्मणाला; मी विस्तव मा. गावयास आलों; तेव्हां मुलीने उत्तर केले की, बरें तर, आतां मी तुला कवाड उघडले त्यापक्षी पाहिजे तर वि. स्तव देते, पण इतःपर तूं माझे घरी कधी येऊ नको. रामाच्या स्वभावास तर उणें उत्तर सोसत नसे, आणि ती मुलगी तर त्यास फारच धिक्कारून बोलली, तें सर्व ऐकून घेतले आणि मनांत खिन्न होऊन विस्तव नघे. तां निघून गेला. मग दुसरे शेजारणीचे येथे गोवरी घेऊन विस्तवा करितां गेला, तिने फटीवाटे गुपचूप पाहून दार नउघ- डतां आपण माडीवर निघून गेली, अशी त्याची जि. कडे तिकडे अप्रतिष्ठा झाली; हे पाहून घरी आला, आणि त्याने मनांत आणले की, मला एक हातारी खाऊ देत असे तिजकडे जाऊन काही मागावें; असा विचार करून तिजकडे गेला, आणि तिजपाशीं फरा- ळाचे मागू लागला; तेव्हां ती ह्मणाली, तूं आपले आ- ईजवळ माग; त्याने उत्तर केले, ती बाजेवर निजली आहे; मग मातारी बोलली की, तर तूं आपल्या बा- पाजवळ माग; रामाने उत्तर दिले की, तोही बाजेवर निजला आहे, आणि उभयतांही दुखणाईत आहों म. गृत सांगतात. असे त्याचे भाषण ऐकतांच हातारी मोठे डोळे फाडून त्यास ह्मणाली, वाहवारे मूर्खा, अरे, ज्यांनी तुझे लहानपणापासून तुझें लालन पाळण के.