पान:बाळमित्र भाग २.pdf/२१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०८ बाळमित्र. लें त्यांचे दुखण्याची खटपट व कांहीं काळजी नकरि- तां आपले पोटाची मात्र चिंता करीत हिंडतोस, तर तु- ला लाज कशी वाटत नाही १ जा येथून, दुष्टा, मला तोंड दाखवू नको; मजजवळ कांहीं ज्यास्त असल्यास जी मुलें मातापितरांची भकि करितात त्यांस देईन, तु. झ्या सारख्या अधमास देणार नाही; त्वां तर आपल्या आईबापांस आजपावेतों दुःखाशिवाय कांहींच दिले नाही. हे तिचे बोलणे ऐकून रामाचे डोळे भरून आले, आणि मुकाट्यां घरी जावयास निघाला; वाटेने येत असता मनांत कल्पना करतो की, मी पुष्कळवेळां दुखणाईत पडल्याची सोंगे घेतली होती, तसे तर आतां आईबापा- नीं सोंग घेतलें नसेलनां ? असें ह्मणून ह्याविषयींची खातरी करून घेण्याकरितां हळच बाजेजवळ जाऊन पाहतो, तंव त्यांचे गालाचे अगदी चे बसून तोडावर प्रेतकळा आली आहे, हे पाहून मनांत फार कष्टी झा. ला, आणि तोंडावर पांघरूण घेऊन स्कुंद कुंदून रडूं लागला, आणि मनांत पश्चात्ताप पावून ह्मणतो, मी के. वढा अभागी!, माझे आईबापांची अशी अवस्था झाली; आतां जर ही मेली तर माझी काय गत होईल? एव्हां- च मला कोणी भाकरीचा तुकडाही देत नाहीं; माझा स्वभाव फार वाईट आहे ह्मणून अशी दशा झाली. अ- गे माझे आई, तूं मजवर भारी ममता करितेस, आणि म्यां द्वाडाने तुला की मुखाचा लेशही दिला नाही.