पान:बाळमित्र भाग २.pdf/२१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामा मुलगा. २०९ आतां माझा बाबा ह्या दुखण्याने मरेल की काय कोण जाणे. ह्याप्रमाणे रामा चिंता करीत असतां तेथून उठून ज्या शेजारणीने पहिल्याने त्यास धिक्कारिलें होतें ति. च्या घरी पुन: गेला, आणि दीनवाणीने ईश्वराचे नाव घेऊन आईबापांकरितां थोडीशी भाकर मागितली; ते समयीं त्याचे दीनभाषण ऐकून घरधनीन बाहेर आली, आणि त्यास ह्मणाली की, तूं ह्याप्रमाणे मागतोस ह्मणू. न मी तुला भाकर व दूध देते, हा विस्तव घेऊन जा, आणि ह्यावर दूध तापीव, आणि आईबापांस खाऊं घाल. ते तुजसाठी फार मेहनत करितात, तर त्वां ही त्यांच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त ठेवावा है ठीक आ. हे. सातारी प्रमाणे हीही रागें भरेल ह्मणून आईबाप दुखणाईत आहेत हे रामा कांहीच बोलला नाही. जर तो बोलता तर ती घरधनीन तत्काळ त्यांचे समाचारास गे- ली असती, कारण की, रामाची आईबा फार भली होती. इतक्यांत रामाने घरी येऊन दूध तापवावया करितां विस्तव पेटविला, दूध ऊन झाल्यानंतर बाजेजवळ दोन पाट मांडले. ही खटपट करितां व घरांत इकडे तिकडे वावरतां जे शब्द झाले ते ऐकून आई बोलली, आज रामा काय इतकी खटपट करीत आहे कोण जाणे. हे ऐकून तिचे नवन्याने उत्तर केले की, तो कांहीं उत्तम आचरण करीत नसेल, ह्या विषयीं तूं मनांत कांहीं एक संशय येऊंदेऊनको. परंतु ती माय