पान:बाळमित्र भाग २.pdf/२१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१० बाळमित्र. मावली तिच्याने राहवेना, ह्मणून ती तोंडावरचा पदर सारून पाहू लागली, तो रामा चुलीज- वळ दोन मोठ्या वाट्या घेऊन त्यांत आपले हातांनी भाकर बारीक चांगली कुसकरून भुगाक- रीत आहे, ते पाहून ती आपले भल्स हळूच ह्मणते की, दोन वाट्या आणिल्या आहेत त्याअर्थी कांहीं त- री आह्मां करितां खटपट करितो आहे, असे वाटते; नाही तर ह्याला दोन वाट्या आणावयाचे प्रयोजन न. व्हते. हे ऐकून तो ह्मणतो, ईश्वर करो की हे तुझें बो- लणे खरे होवो. जशी मला त्याच्या वाईट चालीविष- यी खातरी आहे तशी तो सद्गणी निवडेल ही माझी खातरी असती, तर मला फार समाधान होते.' इतक्यांत रामाने दूधभाकरीचा काला दोन वाट्यांत घालून मातापितरांजवळ आणिला, आणि बोलला की, अहो बाबा, अमे आई, तुह्मी उठा, म्यां तुझां. करितां दूधभाकरीचा काला आणिला आहे हे शब्द ऐकून बाप बोलला, काय रामा त्वां आह्मां करितां दूधभाकर आणली आहे ९ ही तुला कोणी दिली ! रामार्ने उत्तर केले की, ही मला आपला शेजारी रा. मजी पाटील ह्याच्या बायकोने दिली. तेव्हां उभयतांस आत आनंद होऊन ती त्यास ह्मणाली की, बरें तर, वाच्या खाली ठेव. त्यासमयी त्यांची मुखश्री टवटवीत दिसू लागली, आणि खडबडून उठून पुत्रास अति ह. ने आलिंगन देऊन बोलली की, तूं इतका दुर्लक्ष.