पान:बाळमित्र भाग २.pdf/२१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१२ बाळमित्र. सावयास कठीण पडे. एकेदिवशी यमाची आई बाजा. रांत जावयास निघाली, ते समयीं यमाने आईपाशी भारी छंद घेतला की, मला बरोबर बाजारांत ने; तेव्हां तिची आई ह्मणाली, तूं बाजारांत माझा पायगोंवा करशील; तूं कांहीं येऊं नको. यमा ह्मणाली. मी तु. ला कांहीं एक उपद्रव देणार नाहीं; ह्याप्रमाणे तिने अतिशयित आग्रह केला ह्मणून यमास आईने बरोबर घेतलें. मग उभयतां मायलेकी बाजारांत जावयास समागमें निघाल्या. त्यांचे घरापासून बाजार फार लांब होता. त्या रस्त्याने मनुष्यांची दाटीही फार होती, त्यामुळे अ- सें झालें की, यमाने आईचा पदर धरला होता तो हातचा सुटला, तेव्हां पुढे जातां जातां बाजाराजवळ पोहोंचे पर्यंत यमा आपले आईस चुकून मागे राहिली, तथापि यमाने आईस सहजांत आटोपले; पण तो बा. जारचा घोळका मोठा त्यांत तिनें सावधपणे चालावे ते न करितां माकडांचा तमाशा होत होता तो पाहण्याचे नादास लागून तेथेच उभी राहिली, मग पुढे वळून जों पाहते तों आई कोठे नाही; तेव्हां लौकर पुढे धावून गे- ली तरी आई दृष्टीस पडेना; तेव्हां एके उमाठ्याचे जा- ग्यावर उभी राहून पांचचार वेळां हाका मारल्या तरी आई ओ देईना, मग कावरी बावरी होऊन आईला इ. कडे तिकडे पाहूं लागली, पण आई कोठेही दृष्टीस प. डेना, व तिचा शब्दही कानावर येईना; मग तर फा-