पान:बाळमित्र भाग २.pdf/२१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१३ यमा मुलगी. रच घाबरी झाली. लोकांच्या दाटीमध्ये जावयास तिला धैर्य होईना, तव्हां ती एकीकडे उभाराहून आ- ई आई ह्मणून अतिशयेंकरून रडूंलागली. त्या वाटेने जाणारे येणारे लोकांनी तिला पाहिलें, त्यांतून एकजण ह्मणाला, पहा, ही मुलगी संकटांत पडून धायमाय माकलन रडते आहे. दुस-या कोणका- ने विचारले, मुली, तुला काय झाले? यमाने उत्तर दि- ले की, आईची व माझी चुकामूक पडली, तव्हां तो ह्मणाला, मुली चिंता करूंनको, तुझी आई तुला लौ- करच भेटेल. तिसरा ह्मणतो, मुली, उगीच कां रडतेस ? तुझ्या ओरडण्याने आई येते की काय ९ याकरितां उगी ऐस. ह्या प्रमाणे बहुतेक लोक तिजशी एक दोन शब्द बोलून जात. असें होता होतां अकस्मात् प्रारब्ध यो- गाचे बळे करून त्याच वाटेने एक लंगडी गवळण जात होती तिने यमास त्या क्लेशांत पाहिले, तेव्हां तिचे मनांत कळवळा आला, आणि उभी राहून ती यमास ह्मणते, मुली, जेव्हां आईची तझी चकामूक झा- ली तेव्हां तुझी आई कोठे जात होती १ यमाने उत्तर केले की, ती बाजारांत कापड ओळीकडे जात होती; तेव्हां गवळण ह्मणाली की, मुली, रडूंनको, मा बा- जारांतच जाते, तिकडे तुझी आई सांपडेल. असे ऐ. कतांच यमानें त्या गवळणीचा पदर बळकट धरिला, आणि दोघीजणी लौकरच बाजारांत गेल्या; तेथें यमा-