पान:बाळमित्र भाग २.pdf/२२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१४ बाळमित्र. ने आईस पाहतांच मोठ्या आनंदाने हाक मारली; ती हाक आईचे कानी पडतांच लगबगीने धावून ये. ऊन तिने यमास पोटाशी धरले, आणि ह्मणाली की, तूं मजपासून चुकून कोणीकडे गेलीस ह्यामुळे मी फार काळजीत पडले होते. मग यमाने रडतरडत सारे वर्त। मान आईस सांगितले की, मी तेथें माकडांचा तमाशा पहावयास उभी राहिले, आणि पुढे पाहातें तंव तूं कोठे दिसेनाशी झालीस; तेव्हां तुझें नांव घेऊन म्यां पुष्कळ हाका मारल्या, तरी तुझा ठिकाणा कोठे नाही; शेवरी ह्या गवळणीने मजवर दया करून लोकांचे दा. टींतून संभाळून आणून मला तुजजवळ पोहोंचते केले. हे ऐकून यमाचे आईने त्या गवळणीचा मोठा उपकार मानिला, आणि तिची फार फार स्तुती करून तिजज- वळ जें बाकी लोणी राहिले होते ते घेऊन तिने मागितल्यापेक्षा अधिक पैसे तिला दिले. उभयतां मा. यलेकींनी घरी पोहोंचे पर्यंत त्या गवळणीचे उपका. रा शिवाय दुसरी कांही एक गोष्ट काढली नाही. कितीएक दिवसांनंतर यमाने त्या गवळणीचे घरी जाण्याविषयी आईला विचारून एक चोळी लुगडे घे- ऊन तीस नेऊन दिलें, व तिचे सामर्थ्य होते त्याप्र. माणे तिने त्या मातारीचा समाचार घेतला. पुढें को. णतेही एखादें संकट त्या मातारे गवळणीस प्राप्त झालें असतां तिला त्यांतन सोडविण्याविषयी यमा अति आ. नंदानें सहाय होई. अशी प्रीति परस्परांची एकमेकीवर