पान:बाळमित्र भाग २.pdf/२२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सीताराम. २१५ जडली. उपकाराने इतकी ममता वाढेल हे प्रथम त्या गवळणीचे मनांत आले नव्हते. सीताराम. सीताराम ह्मणून एक पांचां वर्षांचा मुलगा होता; तो आई बापांचा एकुलताएक होता. त्याची मातोश्री मरण पावली ह्मणून तो मुलगा आईची अतिशयित खंती करूंलागला, आणि रात्रंदिवस त्याने असा छंद घेतला की, मला आईजवळ न्या. हे दुःख पाहून त्या. चे बापाने फारच हयबत घेतली, तेव्हां आतेने त्या मुलास आपले घरी नेलें; तथापि ती दिवसांतून एकदो. नवेळ त्या मुलास बापाकडे घेऊन जात असे; असे होता होतां आईस मरूल वर्ष लोटल्यावर सीताराम अंमळसा आतेचे नादी लागून सुखाने राहूं लागला होता. बापाचे मनांत वारंवार हेच येई की. बायको मेली, मी झातारा झालों, एक मूल तोही झुरणीस लागला, आतां पुढे काय करावे ह्या गोष्टीची रात्रांदिवस त्या- स चिंता लागली, ह्यामुळे त्याचे दिवसें दिवस अन्नपा- णी तुटत चालले. तेव्हां लोकही कल्पना करीत की, हा हाय हाय घेऊन एखादे दिवशी मरून जाईल, म. ग पोरास आपंगावयास कोणी नाही असे होईल...