पान:बाळमित्र भाग २.pdf/२२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१६ बाळमित्र. तो जेव्हां फार दुखण्यास पडला तेव्हां पंधरा दिव- स पर्यंत आतेनें सीतारामास नित्याप्रमाणे बापाचे भे- टस नेलें नाहीं, सीताराम प्रतिदिवशी आपल्या आते. स ह्मणे की, मला बाबाकडे ने; तेव्हां ती त्या बाळास कांहीं तरी निमित्त सांगून चाळवा चाळव करी. चा. ळविण्याचे कारण हेच की, त्याचा बाप अगदी मर- णोन्मुख झाला होता, आणि त्यानेच सांगितले होते की, मुलास आतां माझे भेटीस आणं नको, कांकी तो माझी अशी अवस्था पाहून प्राणच टाकील. ह्याकरितां आतेने तिकडे नेला नाही. असें करितां करितां दस- याचा दिवस आला तों अदले दिवशी रात्री तो मृत्यु पावला. दुसरे दिवशी सीताराम नित्याप्रमाणे पहांटेस उठून आतेस ह्मणाला, आज दसऱ्याचा दिवस आहे, ह्याक- रितां आज तरी मला बाबाकडे घेऊन चल; न नेशी. ल तर मी अन्न घेणार नाही, असा त्या मुलानें बा. पाच्या भेटीचा फारच छंद घेतला; शेवटी आतेने त्या. स तिकडे न्यावयाचे कबूल केलें, परंतु ती इकडे ति- कडे स्पर्श करूं नदेतां त्यास स्नान घालावयास प्रवर्त. ली, हे पाहून तो बाळ बोलला, आत्याबाई, तूं मला इकडे तिकडे शिवू देत नाहींस, आणि आंघोळही घा- लितेस, तर आतां कोण मेलें बरें ? ह्यास समजले अ. सतां हा एकच आकांत करील ह्या भयाने ती काही न बोलतां उगीच स्तब्ध राहिली. तेव्हां सीताराम ह्मण-