पान:बाळमित्र भाग २.pdf/२२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. पाहूं दे. मला दुःख होईल ह्मणून त्याने बोलावि- लें नाही. मजकडूनच त्यास दु:ख अधिक झाले असते, पण आतां मी काही त्यास दु:ख देणार नाही. हा शेवटचा दिवस आहे ह्यासाठी आत्याबा- ई मला बाबाकडे ने. आत- बरे तर, मी नेते, पण तूं रडूं नको, तूं पहा ब- रे, मला केवढे दु:ख आहे तें; मला खावयास तोच घालीत होता, आता त्यावांचून मला कोणी रा. हिले नाही, मी फार गरीब बायको. एकतर तो माझा भाऊ, दुसरे नातें अन्नदाता, तो जेव्हां मा- झा नाहीसा झाला तेव्हां आज मजवर केवढा दुःखाचा डोंगर पडला आहे ? आतां म्यां सर्व भार ईश्वरावर ठेविला आहे तसा तंही ठेव; आणि ज- शी म्यां दगडाची छाती केली आहे तशी तूहा कर. सीता०- होय होय, आतां दगडाची छाती केली पा. हिजे, पण, आत्याबाई, मला माझे बाबाकडे ने; त्याची तिरडी तरी एकवेळ मला पाहूं दे, मग सीताराम आतेचा हात धरून तेथून जो नि. घाला तो बापाचे घराजवळ पोहोंचला, आणि पाहतो तो त्याचे तिरडी भोंवताली शेजारी पाजारी, ओळखी दे- खीची माणसें, उभी आहेत, आणि सर्व लोक दुःखित होऊन त्या पुण्यपुरुषाची प्रशंसा करिताहेत; इतक्या- मध्ये सीताराम पुढे लगबगीने धावून जाऊन बापाचे