पान:बाळमित्र भाग २.pdf/२२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सीताराम २१९ तोंडांत तोंड घालून त्या प्रेतावर पडला. त्यासमयीं त्या- चे डोळ्यांतून पाण्याचा लवलेश देखील ननिघतां त्या- चे शरीराची कोरड वळून गेली. मग काही अवका. शाने बोलूं लागला. बाबा, तूं मला टाकून चाललास, आतां मी कोणाकडे पाहूं, मला कोण सांभाळील! म- ला केवढे दु:खाचे डोंगर झाले! जेव्हां माझी आई मे- ली तेव्हां तूं तर भारीच रडलास, पण माझें समाधान केले, तूं मेलास आतां माझे समाधान कोण करील १ मग, अहो बाबा, अशी मोठ्याने हाक फोडून निपचेत पडला, आणि दु:खामुळे तोंडाची कोरड वळ- ली, व मुखांतून एक शब्द ननिघतां त्या लेकरानें चि. मणी सारिखा आ वासला; त्यासमयीं त्या मुलास प्रेता- वरून उठवावयाचे त्या आतेस फार कठीण पडले. मग त्याचे आतेने विचार केला की, जर ह्या मु. लास स्मशानांत नेलें तर हा काय करील नकळे ह्या भयाने ती सीतारामास शेजारणीचे घरी ठेवून त्याचे बापास पुरावयास गेली. प्रेत खळीत घालतेसमयी जी. का स्मशानांत एकच आरडा आरड झाली ती सीता- रामानें ऐकतांच तो घरधनिणीची दृष्टि चकवून निघा- ला तो स्मशानभूमीस आला; तेथें सर्वलोक पुरण्याचे गडबडीत होते, इतक्या संधीत त्याने अकस्मात जाऊ- न, मला बाबा बरोबर पुरा, असें ह्मणून धाडकन ख- ळीत उडी टाकिली. त्या बाळाची इतकी ममता पा. हून जवळच्या लोकांची अंतःकरणे कळवळली; आ.