पान:बाळमित्र भाग २.pdf/२२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२० बाळमित्र. णि त्यांनी सीतारामास मोठ्या बळाकाराने बाहेर का. ढिले. पुढे तीन दिवसपर्यंत बापाचे स्मरण करून वे. ड्यासारखा इकडे तिकडे धांवे, आणि त्याचे डोळ्यांतून पाण्याचे लोट चालले असत, अशी त्याची अवस्था फार कठीण झाली. अनंतर त्या मुलाचे रडणे तर रा. हिले, परंतु त्यास उदासीनता फारच झाली. ही गोष्ट एक्या रुपावंत सावकारास कळली; तो सीतारामाचे बापास ओळखीत होता, ह्याकरिता तो त्या मुलास पहावयास त्याचे आतेचे घरी आला, आ- णि सीतारामाचे दुःख पाहून फार दुःखित झाला. मग तो सीतारामास आपले घरी नेऊन त्यावर पुत्रासारखी ममता करूं लागला, तेणेकरून त्याचे रडणे व उदासी. नता दिवसें दिवस कमी होत चालली. तेव्हां सीतारा. माचे मनांत इतका निश्चय झाला की हा सावकारच आतां माझा खरा बाप. सावकाराचीही प्रीति त्यामु. लावर त्याचे उत्तमगणेकरून उत्तरोत्तर अधिक होत गेली. पुढे सीताराम वीस वर्षांचा झाल्यावर तो आप. ल्या मानलेल्या बापाचा कारभार बहुत खबरदारीने करूं लागला. पुढे सावकाराने सीतारामास आपली कन्या व कांहीं द्रव्य देऊन वेगळे ठेविले. ह्यापूर्वी सीताराम आपले आतेचा समाचार यथा शक्ति घेत असे. पढें संपन्न झाल्यावर त्याने तिला दारिद्यापासून सोडविले. प्रतिवर्षी विजया दशमीचा दिवस आला ह्मणजे सी-