पान:बाळमित्र भाग २.pdf/२२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सीताराम २२१ तारामास त्या दुःखाची आठवण होई, आणि त्याचे मनांत असें वागत असे की, जे मला दुःख प्राप्त झालें होते त्याचा परिहार मी उत्तम रीतीने वागलों ह्मणून झाला; तर, असेंच सुरीतीनें निरंतर वर्तावे, ही बुद्धि त्याला त्या दु:खानेच शिकविली. लहान गोपाळ. कांही संस्कृत शब्द पाठ करून संवत्सर प्रतिपदेचे दिवशी गोपाळा खोलीतून बाहेर आला, आणि आप- ले आंगी मोठी प्रौढता आणून बापापुढे बोलूं लागला. अहो दादा, जसे लोक एकमेकांशी संस्कृत भाषण बोलतात तसा मी तुह्मांशी बोलतों; पहा, आरोग्य, सौख्य. इतके बोलून अटकला, पुढे काय बोलावे त्याची त्यास स्मात होईना; तेव्हां तो इकडे तिकडे पाहून आं- गरख्याचे पेशकळीस पीळ घालूं लागला, परंतु त्याचा तो पीळ व्यर्थ झाला. त्याला संस्कृत शब्द पुढे आठ. वतना ह्मणून तो खिन्न होऊन अंमळ सा रडकुंडी झा- ला; त्याची ती अवस्था पाहून बापास मोह उत्पन्न झा- ला, आणि तो त्याशी बोलू लागला. शाबास बेय, बरेंच मजेचे संस्कृत भाषण बोलला. स, ही कल्पना तुझीच असेल असे वाटते. गोपा.- नाहीं नाहीं, दादा, तुझी मला शाबासकी