पान:बाळमित्र भाग २.pdf/२३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२४ बाळमित्र. भार असाच ईश्वर निरंतर चालवो, आणि तुहां- कडून हाताखालचे जे लोक आहेत त्यांचे कल्याण होवो; जे मातारे आहेत त्यांशी अशारीतीने बो- लावें की, तुह्मी आणखी फार दिवस वांचा, आणि तो पावेतों तुमचे हातपाय धडसे खडसे राहोत; आणि ईश्वरापुढे आपले अपराध कबूल करून न्याचे चिंतनानें भवसमुद्र उतरून जा. गोपा.- वाव्हा दादा, तुही मला फार चांगले शिकवि- लें, आतां मी सर्वांपुढे असेंच बोलेन; पण, दादा, गुढीच्या पाडव्याचे दिवशीच लोकांशी असे भाषण कां करावें, बरें? बाप-- बाबा,संवत्सर प्रतिपदाही काही एक कालमा- नाचा अवधि आहे. प्रत्येक वर्ष त्या कालमाना- च्या एक एक पायरीसारखे आहे; त्यांत आपण वांचणार आहों, आणि एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर जात आहों; ह्याकरितां आपले इष्टमित्र असतील त्यांनी येऊन एकमेकांस भेटावे आणि ह्या वर्षारंभापासून पुढल्या वर्षारंभापर्यंत काळ आ. नंदाने जावा ह्मणून परस्परें कल्याणप्रद मंगळरूप भाषण करावे. हे बोलणे तुझ्या मनांत भरलेंना पण गोपा.- होय, दादा, हे मी समजलों. बाप- तुला मी दुसऱ्या दृष्टांता वरून ध्यानांत याव- यासारखें सांगतो. किती एक दिवसांमागे आपण