पान:बाळमित्र भाग २.pdf/२३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान गोपाळ२२५ सिंहगड किल्ल्यावर गेलो होतो, तेथून पुणे शहर दृष्टीस पडत होतें तें तुला आठवतें ९ आणि येथून पुणे शहर लांब आहे हे मनांत न आणितां ति- कडेस चला ह्मणून त्वां भारी छंद घेतला होता, ठाऊक आहे ? गोपा०- होय, दादा, खरी गोष्ट; पण मी ते दिवशी थकल्यावांचून तेथवर पायी चालत गेलो नाही बरें ? बाप- तें खरेंच; ते दिवशी तूं बराच चाललास; पण आठवण कर की कोसा कोसावर खुणांसाठी जे चिरे पुरलेले होते त्यात्या ठिकाणी म्यां तुला वि. सांव्यासाठी बसविले होते. गोपा०- खरेंच, दादा, मला असे वाटते की ज्यांनी ते दगड रोविले त्यांनी ती कल्पना फार चांगली काढली, त्यावरून आपण किती कोस आलों, व कितीकोस पुढे लांब जावयाचे राहिले हे सम- जतें. बाप- तर ह्याप्रमाणेच काळमानाची गणना आहे, तं आपल्या तोंडानेच बोललास की त्या रोवलेल्या दगडांवरून किती आलों व पुढे किती जावयाचें आहे हे समजतें; तर ह्याचेही तसेंच आहे; आज पावेतों आयुष्याचे कालमान किती झाले व पुढे किती राहिले हे समजते; तें निहें मान एकसारखेच आ- हे, त्यावाटेंत जे काय झाले ते सांग ह्मणजे त्या-