पान:बाळमित्र भाग २.pdf/२३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२६ बाळमित्र. वरून आणखी एक तुला दृष्टांत देतो. गोपा... दादा ते मला सारे अझून आठवते. पहि- ल्याने माझा नवा दम होता ह्मणून मी धावू ला. गलों, तो मला वारंवार ठेचा लागू लागल्या; ते. व्हां तुही सांगितले की, अझून रस्ता फार लांब आहे ,ह्याकरितां हळू चाल. मग तुमच्या झटल्या- प्रमाणे हळ चालू लागलों, तेणेकरून माझेच हित झाले. मला वाटेने जे नसमजलें तें तुमी समजावू- न सांगितले, आणि जेव्हां विसांवा घ्यावया जो. गी चांगली जागा आढळे तेव्हां आपण त्याठिका- णी बसूं; तुही पोथींतल्या मोठ मोठ्या कथा मला सांगितल्या, आणि वाटेने चालता चालतां नानाप्र- कारच्या गोष्टी सांगून मला हांसविले; त्यामुळे म- ला वाटेंत कांहीं अवघड वाटले नाही. मग आपण तेथे पोहोचल्यावर पक्वान्नाचे खासें मजेचे जेवण जेवलो. बाप- त्वां बहुतेक सर्व सांगितले पण त्यांतील एक दोन गोष्टी तशाच ठेविल्या; त्यांचा मला फार संतोष झाला, त्या ह्याच की एक आंधळा खाड्यांत पड. ला होता त्यास त्वां हातांत धरून वाटेस लावलें आणि एके गरीब मातारीचे गांठोडे बैलावरून खाली पडले होते ते त्वां धांवत जाऊन तिचे ति. ला नेऊन दिले, आणि भिकाऱ्यांस त्वां कांहीं पैसेही दिले.