पान:बाळमित्र भाग २.pdf/२३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान गोपाळ. २२७ गोपा.- दादा, तें मी काही विसरलों नाही; पण आपली बढाई आपण आपल्या तोंडाने बोलूंनये, असें तुह्मींच मला शिकविले होते, ह्मणून बोललों नाही. बाप- तुजमध्ये इतका समज आहे, हे पाहून मला फार आनंद झाला. आता मी सांगतो तें तें चित्तदे ऊन ऐक, पुण्यास जाण्याचे कूच आणि हे कूच सार- खेंच आहे; तूं तेथून निघतेसमयी मी थकेन ह्याचा विचार नकारतां धूम पळत सुटलास, आणि ठेचा खाऊ लागलास; त्यावेळेस मी जवळ होतो म. णून बरे झाले. तसें ह्या आयुष्यमार्गात तारुण्या- चे दमाने अविचारेकरून जो चालूं लागतो त्याला सुरीतीने वागवावयास जर कोणी सन्मित्र मिळा- ला तर तो उत्तम चाल व चांगल्या गोष्टी शिकवी- ल, तेणेकरून जसे त्या वाटेचे श्रम तुला वाटले नाहीत तसे ह्या संसार मार्गाचे क्लेश होणार नाहीत. वाटेने गरबि लोकांवर उपकार करून पुण्यास पो- होंचल्यावर जसे आपणांस मिष्टान्न भोजन मिळाले तसें ह्या नरदेहांत येऊन पुण्यकर्म केल्याने येथू. न कच करून ईश्वरापाशी गेल्यावर सुख प्राप्त होते. गोपा.- होहो, दादा, दृष्टांत तर खासा मिळाला; आ. तां मला दिसते की यंदां फार सुख प्राप्त होईल. बाप- आतां तुला आणखी एक त्यांतीलच दृष्टांत सां-