पान:बाळमित्र भाग २.pdf/२३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. गतों, ऐक. रस्त्याने चालता चालतां आपण मागे पाहूं त्याचे तुला स्मरण आहे ? केव्हां केव्हां आ- पण उंच जागेवर उभे राहून मागून किती आलों हे पहात असूं ह्यामुळे सर्व आपल्या लक्ष्यांत येई. गोपा.- होय, मी इतका लांब चालत आलों हे पा. हून मला आनंद होई. बाप- आतां तुझी जी वर्षे मागे लोटली त्यांकडे पा. हिल्यावर तसा संतोष वाटणार नाही की काय ? तूं ह्या जगांत नग्न उपजलास तेव्हां तुझे आईने तु- ला स्तनपान करवून जिवविलें, आणि आतां तुझा सांभाळ व विद्याभ्यास मी करवितों आहे, हा आ- मचा उपकार त्वां कोणत्या रीतीने फेडावा ते ऐक; तूं उत्तम रीतीने वागन नांवा लौकिकास चढ ह्मणजे झाले, हीच आमची इच्छा आहे; येणेकरून तुझेंच हित होईल ज्यांत तझेंच कल्याण अशारीतीने वागवि- णार जे आईबाप त्यांचे पोटीं तुला ईश्वराने जन्मास घातले ह्यासाठी त्यांचेठायीं लक्ष्य ठेवून त्यांची व गुरुची सर्वदा मर्यादा ठेवीत जावें; बहीण भाऊ यांची निरंतर ममता करीत असावें, आणि जे आपले सेवक- जन असतील त्यांचे कधी मन दुखवू नये, व ध. न्याशी व वडिलांशी उद्दामपणे वागं नये. फारका- य सांगू ९ थोडक्यात सांगतों; जे तुला आमी नि. त्यनित्य - उत्तमाचरण शिकवीत आलों तें मनांत ( ठेवून त्याप्रमाणे वागत जा, झणजे त्यांत सर्व आहे.