पान:बाळमित्र भाग २.pdf/२३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भातुकली. २३, द्यावयास सांगितली; आणि उमाकांतानें आपले बहिणीस सांगून माझे बहिणीला जुनी पांघुरणे देवविली. नाना- त्वां मघां भातुकलीचें नांव घेतले, तर गड्या, उमाकांताला चांगली चांगली भातुकली मिळाली असेल. विठ्ठ- त्यांचा बाप मातबर आहे, मग चांगली मिळा. वयाचे काय आश्चर्य त्याला नित्य नित्य पु. ष्कळ खाऊ मिळतो, ह्मणून त्याला काही फार- सा आनंद नाहीं; ज्याला कधी मिळत नाही न्या. ला ते अप्रूप वाटते, उमाकांताचें मन सदा खाल्ले घाले आहे, त्याला तर पेढे, बरफी, जांब, केळी, नारळ, साखरेची चित्रे, पुतळ्या, हत्ती, घोडे, असे कितीक मिळते. पाहिजे तर तूं त्यासच कां विचा- रसिना नाना झटलें, अगोदर तुला विचारावे मग त्याजकडे जावे, असा माझा मनसुबा, कां की ह्याचे काही गुप्त कारण आहे. विठू- ते काय ते मला सांग. नाना-ती गोष्ट कोणास -सांगावयाची नाही, पण तु. जजवळून जर कोठे फुटणार नाही तर तुला- विठू- मी कांहीं चहाडबुचका नाही, सांगायाला. नाना- तर वचन दे. विठू- घे, मी हातावर हात मारितों.