पान:बाळमित्र भाग २.pdf/२३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३२ बाळमित्र. नाना- हे पहा, तूं कांहीं उमाकांताला कळू देऊ नको, म्यां तिला खूब ठकविलें. विठू-काय! त्वां माझे उमाकांताला ठकविले । ही कांही आनंदाची गोष्ट नव्हे, हो. नाना- उमाकांताला काल काय काय मिळाले ते तुला त्याने दाखविले असेल. विठू- होय, त्याने मला सारे दाखविले; पण एकदा पाहून ध्यानांत कसे राहील १ पण पहिल्याने तर त्यास मुद्या, पागोटें, व कित्ते, व बखरी, असें मि. ळाले होते. नाना- त्याची गोष्ट मी तुला विचारीत नाही. पण ह्या दिवशी मिठाई वगैरे पोरांची भातुकली किती मि- लाली हे मी विचारतों. विठू- असला खाऊ रावजींनी त्यास काही दिला नाहीं; ते ह्मणाले की, गोड खाल्ल्याने पोटांत एखा- दा रोग होईल; पण त्याची जी आत आहे तिने कांही दिले आहे. नाना- ते काय काय दिले आहे ? सांग, बरें. विठू- ते माझ्याने कसे सांगवेल, म्यां ऐकिलें देखील नाही. नाना- जातर, मी तुला कांहींच कळविणार नाही. जी गुप्त गोष्ट आहे ती तुला अझून म्यां कुठे सां- गितली आहे? विठू- काय ह्मणतोस नाना १ एकून, तूं माझ्या मि.