पान:बाळमित्र भाग २.pdf/२३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भातुकली. वाचा असा अन्याय करूं पाहतोस : नाना-आझी उभयतांनी तसाच करार केला आहे, मग काय विठ- ते मला समजत नाही. पण तो जर फसला असला तर त्वां त्याचा अन्याय केला. नाना- पण, आमीं परवांचे दिवशीं कबूल केले होतें की, ज्या पार्थाचा वांटा व्हावयाजोगा असेल ते पदार्थ आपण वांटून घेऊ. विठू- जर असें आहे तर ह्यांत कांही त्याचा तोय नाही, त्याचे रावजींपेक्षां तुझा बाप मातबर आहे, न्यापक्षी तुलाच चांगली भातुकली पुष्कळ मिळाली असेल. नाना- तूं ह्मणतोस ते खरेंच आहे; परंतु पहा, मला खाशी घोडी मिळाली आहे हिचा वांटा व्हावयाचा नाही. विठू- पण तुला दुसरे काही मिळाले नाही नाना- तुला खरेच सांगू? पावशेर पेढे व पैशाचे जांब ह्यांशिवाय काही भातुकली मिळाली नाही. माझा बापही उमाकांताचे बापाप्रमाणेच बोलला की, व. शट गोड खाल्लयाने पोराचे पोटगंत एखादा रोग उ- त्पन्न होईल. काय सांगू, विठू ? माझी आई जर जीवंत असती तर ती गोष्ट काही आणखी असती; आई होती तेव्हां तर पेढे, बरफी, अंजीर, केळी, नारळ, असे मला पुष्कळ मिळत होते; ते गेलेवर्षी