पान:बाळमित्र भाग २.pdf/२४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३८ बाळमित्र. विठू- आतां जसा करार असेल तसे करणे प्राप्त आहे; तुला असें करावयाचे काय प्रयोजन पडले होते। उमा०- त्याला गेले वर्षी भातुकली फार मिळाली. होती, ह्मणून मी असें केलें; आतां, करायास गे. लों एक आणि झालें एक. विठू- मला तुझा मनसुबा कळला; नानास फसवाव. यास पहात होतास, पण तंच फसलास; जशी वा- सना तसे फळ, बरीच तुझी खोड निघाली. पुन्हा असे करशील की नाही! उमा:- आता मला हा फस मामला झाला खरा. मी..आपली भातुकली घेऊन खुशाल असतो, तें सोडून मला कोणीकडून बुद्धि झाली कोणजाणे. विठ- आतां जिवाला खाऊन काय होते ? झाले ते झालें. अर्धा वांय तुझांस पुरे होणार नाही? उमा०- तुला कसे दिसते बरें: नानाने ह्यांत काही लबाडी तर केली नसेल ? विठ- तो लबाडी करणार नाही, कांकी तुमचे अगो. दरच जे मिळाले ते त्याने येऊन मला सांगितले. आणि तुला सांगतो, माझा स्वभाव असा आहे, कोणी लबाड जरी असला तरी तो लबाड अशी खातरी होई पर्यंत मी त्याला खरा मानीत असतों. उमा०-पण त्याचा बाप अगोदर त्याला खाऊ पुष्क. क देत असे, आणि आज एवढासाच दिला, ह्याचे