पान:बाळमित्र भाग २.pdf/२४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भातुकली. मला आश्चर्य वाटते. विठू- त्याची आई त्याला पहिल्याने फार भातुकली देत असे, पण त्याचे बापाने तीबद्दल त्याला एक घोडी दिली. उमा०- मला वाटते; ज्याचा वांय करावया जोगा आहे ते तो लपवून ठेवील, पण मला तर आपले - भातुकलीतून देणे प्राप्त आहे. विठ- त्याने खोटाई केली तर मग मी त्याला जवळ उभे राहू देणार नाही.. उमा०- एकवेळ त्याने लबाडी केली झणजे मी क. रारांतून सुटलों, मग मीही त्यास काही देणार नाही. विठू- तुमचे मनांतला भाव मी समजलों; पण, बाबा, तो एक लबाडीवर आला ह्मणन तह्माला येतां येते. उमा०- मला जे मिळाले ते मी त्यास कळविले ना- ही तर त्याचे समजण्यांत कशाने येईल ? विठ- बरें, त्याचे एक ध्यानात येणार नाही, पण तु. मचे मन तर तुह्मांस ग्वाही देईल की नाही उमा०- वांटणी करावया जोगें रावजींनी तर काही दिले नाही, पण आत्याबाईनें बरीक दिले आहे. विठू-तुमचा करार का असा होता की बाप जे देई- ल तेवढ्याची मात्र वाटणी करावी उमा०- नाही, नाही, असें नाही. विठू- तर मग असें कां बोलतां १