पान:बाळमित्र भाग २.pdf/२४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भातुकली. २४५ भारी नुकसानी झाली. इतका माझा नाश झाला तरी अशा करारांत नाना मला मूर्ख असे समजेल. काल रात्रीस त्याने मजकडे आपली मिठाई पाठ- विली तेव्हांपासून त्याचे मनांत आनंद मावत नसेल. प्रवेश उमाकांत आणि जान्हवी. जान्ह - ( हारीने मांडलेले पदार्थ पाहून बोलते.) कायरे करतोस उमाकांता १ हे दोन वांटे कशाला केले १ तर एक वांटा माझा काढला आहे की का. य : तूं कुठला द्यायाला ९ जर देशील तर, पहा, मी तुझी बटीक होईन. उमा०- काय सांगू, बाई १ हा वांटा तुला जरी दिला असता तरी मला इतके श्रम वाटते ना; पण तसें कोठे आहे १ हा एक वांया दुसऱ्याचा आहे. जान्ह०- दुसऱ्याचा कशाचा; आतां मी समजले; या वांट्याकरितां विठून कांही नवीच कल्पना काढली असेल, आणि युक्तीनेच तुला फुसलावून हा वांटा तो घेणार असेल; असेंच तो नेहमी करीत असतो. उमा०- असें बोलूं नको, जान्हवी; तो फार चांगला रीतीचा माणूस आहे. तसा मी असतो तर मला संतोष वाटता. जान्ह - तर मग असें कां करितोस १