पान:बाळमित्र भाग २.pdf/२५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भातुकली. न घेतला असेल की उमाकांतास फसवून जे काय मिळेल ते आपण उभयतां वांटून घेऊ. उमा- छी, छी, छी, असें ह्मणूनको; तो फार खरा आहे. विठू असें कद्धी करणार नाही. जान्ह.- काय सांगावें तुला १ तुझ्या मते मी जसा खरा तसेच सर्व लोक खरे असतील; पण तूं असें पहा, ह्यांत कांहीं तरी विठूचे हित असेल ह्मणून तो तुला रुकार देतो. उमा०- विठोबाचे मनांत की आपल्या मित्राने खोटें बोलूंनये, खरेपणाने वागावें, ह्मणजे मला संतोष होईल. जान्ह०- अहाहा, अशाने तला ते आजागळ ठरवि- तील, आण फार हांसतील. उमा०- पण, पहा, म्यां कराराप्रमाणे हे वांटे करून ठेवले आहेत, आतां नाना येईल. जान्ह - तूं त्या नानाला वांटा नदेतां माघारा लावू- न दे. त्याचे मनांत की, मी उमाकांतास फसविले, तर तूंच त्याला फशीव, झणजे मला फार आनंद होइल. उमा०- असे काय ह्मणतेस, जान्हवी १ येवढ्याशा भातुकली करितां मी चौघांत खाली पाहूं काय ? जान्ह.- चैौघांत खाली न पहावया जोगी अशी युक्ति केली तर मग कसें १ उमा०- ती कशी काय बरें । ऐकूदे.