पान:बाळमित्र भाग २.pdf/२५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. जान्ह.- आतां मी रावनीस नाही तर आतेस असें सांगेन की, उमाकांतानें नानास अर्धा वांटा देऊ केला आहे; मग ते त्याच्या देखत तुला देऊ नको ह्मणून बोलतील झणजे झाले; मग तुजकडे काय आहे १ मीच आपल्यावर लबाडी घेईन. उमा०- असें तूं करूं नको हो बाई.. जान्ह - बरें तर, तुझ्या मनास येईल तसे कर; त्या लबाडास सारेच कां देईनास, बापडें १ माझे काय जाते १ तेच तुला हांसतील. थांब तर, घाबरा होऊ नको, आतां मी रावजींना जाऊन सांगते.( ती निघून जाते.) उमा०- अगे जान्हवी, तं माघारी ये, जाऊंनको, न येशील तर मी तुजवर रागें भरेन.( तो तिलामावा- रें फिरवायास तिचे मागे जातो, परंतु ती कांहीं माघारी येत नाही.) अंक २. प्रवेश १. उमाकांत. जान्हवी माझें न ऐकतां रावजी कडेस निघून गे- ली, हेही बरेंच झालें, आतां रावजी किंवा आत्याबाई देऊ नको.असें जर मला ह्मणतील तर मी देणार ना., ही. ही कल्पना मला अगोदरच जर सुचली असती