पान:बाळमित्र भाग २.pdf/२५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भातुकली. २४९ तर बरें होतें. म्यां पक्का विचार नकरिता हा करार केला, ह्यांत ठीक झाले नाही. आतां माझें मन दुग्ध्यां- 'त पडले, ह्यावेळी विठोबा असता तर बरे होते. प्रवेश २ विठू आणि उमाकांत. विठू- आतां नाना आपल्या बापास पुसून येईल, तुह्मी हे सर्व पदार्थ त्याला आदराने द्या, तुझी आ. पले मनांत खेद आणला हे त्यास दाखवू नका. पण माझे मनांत त्याविषयी काही संशय आहे, त्याने काही दगाबाजी केलीसे दिसते. कशावरून ! जेव्हा मी त्याला लावून बोललो तेव्हां तो सांग- ण्यांत अंमळ घाबरा झाला. उमा०- तो मला फसवावयास पाहतो हे मी पुरते जाणतों तरी बाहेर आनंद दाखविला पाहिजे. विठ- संतोषित असावें असें एक कारण आहे,पण तुझी आपला खरेपणा सोडूं नका. उमा०- बरें तर, मी नाना देखत हर्षयुक्त राहीन, पण नान्हवीने एक युक्ति सांगितली ती तुझे ध्या- नास येईल तर सांगतो. तिचे मणणे की हे वर्त- मान रावजींपाशी जाऊन सांगावें, ह्मणजे सहजच रावजी नको असें ह्मणतील, मग काम झाले.