पान:बाळमित्र भाग २.pdf/२५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भातुकली. २५१ उमा०- तुझ्या जिवाला कां गोड वाटत नाही? नाना-- मला अगदीच थोडके मिळाले ह्मणून. उमा०- त्याची काय चिंता आहे हा तर डाव आहे. विठू-तुह्मांला पहिल्याने एक थोडे मिळाले पण आतां त - र उमाकांताच्या भातुकलीतून निमेनिम वांया मिळेल, मग,हो, कां तुह्मी चिंता करतां ९ हे तुमचे मित्र तुझां- स काही कमी पडूंदेणार नाहीत. ते आपल्या वचना प्रमाणे फार संतोषाने वागतात. उमा०- पहा, मी जें करितों तें मनापासून संतोषाने करितों. ( नानाचा हात धरून वांग्यां कडे नेतो.) मला जे काय मिळाले त्याची वाटणी म्यां बरोबर केली आहे; तुह्मीं असंतोषी न व्हावें झणून मी तुमचे वाटणीकडे काही अधिक पदार्थ ठेविले आहेत, पहा. विठू- बुदबळे गंजिफा ह्यांचे निमे निम वांटे होत ना- हीत, त्यास करारा प्रमाणे उमाकांताची मर्जी अस- ल्यास त्याने दोन्ही ठेवावी; पण ते तुह्मांस करारा पेक्षा अधिक देणार आहेत. उमा०- ह्या पुतळ्यांचे वाटे बरोबर करतां आले नाहीत ह्यासाठी ह्या तुह्मीच घ्या. नाना- नको, नको, तुमचे बोलण्यानेच मी तृप्त झालों उमा०- पण मी अझून तृप्त झालों नाही, ह्या खेरीज दिवाणखान्यांत द्राक्षांचे घड राहिले आहेत, त्यांत. ला निमे वांय माझा आहे, पण मी ते सर्व तुह्मांस देतो.