पान:बाळमित्र भाग २.pdf/२५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भातुकली. २५३ उमा०- तूं इतका श्रमी कां होतोस. नाना ? नाना०-- मला इतकें श्रमी होण्याचे कारण हेंच की तुह्मांपुढे एक लबाड पुरुष उभा आहे. तो कोणता ह्मणाल तर हा मीच; कांतर म्यां तुझांस ठकविलें. उमा०- त्वां मला ठकविले ! असे कसे घडेल ९ तुझी आह्मी शेजारी, त्यांत बाळपणापासून तुझी आणि माझी मैत्री. तशीच तुझ्या बापाची आणि माझ्या बापाची ही जिवलग मैत्री आहे, अशा ठिकाणी ही शंका कशास पाहिजे, ह्याविषयी माझे मनांत काही नाही. नाना०- ह्याच कारणास्तव हा माझा दोष आहे, (तो. उमाकांताचा हात धरितो. ) म्यां तुह्मांपाशी फारच लबाडी केली. माझे बापाने मला काही खाऊ दिला नाहीं खरा, पण मिठाईंबद्दल ह्या तीन मोह- रा दिल्या आहेत. तुही मन इतकें उदार केले आणि मी पहा कसें तुह्मांस ठकविलें तें; ह्यामुळे माझ्या जिवास फार खाते; मी पस्ताई पडल्यासा- रखा झालो, तर आतां मी मोहरांचा वाटा तुह्मांस देतो. तुझी मजवर दया करा; माझ्या लबाडीची क्षमा करा, आणि मित्रत्वांत अंतर पडू देऊ नका. उमा०- (त्यास आलिंगून ह्मणतो.) माझे जिवलग मित्रा, त्वां वाइट चाल सोडून उत्तम चाल धरली येवढयानेच मी फार संतुष्ट झालो, तर मला त्या द्र. २२