पान:बाळमित्र भाग २.pdf/२५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भातुकली. २५५ नाही याचे कारण तोच आहे; मलाही त्यानेच शिकविलें, प्रथम मी फार नीचपणाने वागत होतों, पण इकडे येऊन व त्वां जी उदारपणानें वांटणी केली ती पाहून- उमा०- नाही, नाहीं, ती मी काही वाटणी केली नाहीं, विठोबानेच केली; आणि नाना, मला कसे भुरळे पडलें कायजणू, पहिल्याने मी ज्या पदार्था- वर प्रीति ठेवीत होतो. तेच पदार्थ तुला देण्यावि. षयी मला संतोष वा लागला, तुझे वांग्यांत मी आपले खुशीने कितीएक पदार्थ अधिक ठेविले आहेत. नाना- सर्व तुझें तूंच ठेव, मी काही ते घेणार नाही, जर हे घ्यावे अशी माझी बुद्धि असती तर मला तुझे तोंडाकडे पाहण्यापुरते देखील धैर्य राहिले नसते. अन्यायकर्म केल्याने अंतःकरणांत किती दुःख व पश्चात्ताप होतो हे मला पूर्वी रावके नव्हते. उमा०- माझ्या देखील चित्तांत फार दु:ख झाले अ. सते, पण तसे नहोण्याचे कारण तो विठोबाच; तो फार भला व प्रमाणीक आहे. बरें, नाना, त्याने असें तर झटलें नाहीं, की उमाकांताकडून तुला निमे वांटा देवितों, मग तूं मला त्यांतला हिस्सा दे १ पण असें त्याने मागितले नसेल. नाना.- छिः छिः तो असें करील हे तुझ्या मनांत तरी कसे आले