पान:बाळमित्र भाग २.pdf/२६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५६ बाळामित्र. उमा०- माझ्या मनांत नव्हते, माझ्या बहिणीचे म. नांत हेवा येऊन तिने मला असे भासविले. नाना०- तुला काय काय मिळाले हे वर्तमान जेव्हां मी त्यास विचारूं लागलों, तेव्हां तो कांहीं ताका- सतूर लागू देईना, पण मी हळूच युक्तीच्या पोर्टी विचारून सर्व काढून घेतले, त्याने तुजविषयी फार खातरजमेच्या गोष्टी सांगितल्या. तो फार चांगला मनुष्य आहे, आजपासून मी त्याची मैत्री बाळगी- न, आणि मी आपल्या तीन मोहरा व वांटा त्यास देईन. उमा०- तूं नको देऊ; त्याचा उपकार मीच फेडीन, तुझ्या मोहरा तूंच ठेव, व माझाही अर्धा वाटा तू घ. नाना०- ते मी आतां कद्धी कबूल करणार नाही, जे काय वांटायाचे आहे ते त्यासच द्यावे हे बरें. उमा०- चलतर, तूं ह्मणतोस तसेंच का होईना ? आ- तां आपण असे करूं, हे सर्व पदार्थ त्याचे आ. ईचे जवळ पोहोंचते करावे. झणजे तो घरी गे. ल्यावर पाहील, आणि त्यास फार आनंद होईल. नाना०- पण तो इतक्यांत आला तर आपणाला कांहींच करूं देणार नाही; ह्याकरितां लौकर केलें पाहिजे. उमा०- मी उम्यास हाक मारून आणितो, इतक्यांत नूं हे सर्व एक्या टोपलीत भरून ठेव, मी हा आ- तांच येतो. (तो बाहेर जातो.)