पान:बाळमित्र भाग २.pdf/२६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६० बाळमित्र. आह्मांवर फार उपकार केले, ह्याने आह्मांस मुरी- तीने वागावयास शिकविले. नाना- आणि माझीही ह्याने प्रतिष्ठा वांचविली. उमा०- आतां आली ह्याचा उपकार फेडूं ह्मणतो, प. ण हा फेडू देत नाही. माध.- तुमी मला फार समाधान पावविलें, ह्यास्तव मीच ह्याचा बंदोबस्त करितो. ( नाना व उमाकांत ह्यांस ह्मणतो.) तुह्मी आपापलाले वांटे मजपुढे ठे- वा, ह्याने तुह्मांवर जे उपकार केले आहेत ते मी फेडीन. नाना- विठोबास माझ्या तीन मोहरा घ्यावयाची आज्ञा द्या. विठू- नका, नका, रावजी, त्याचे तुह्मी काही ऐकू नका. माध.- मी तुला ह्याचे हे व्यावयास सांगतो. मुका. ख्याने घे; जर न घेशील तर तुझ्या आंगीं गर्व भारी असे स्पष्ट दिसण्यांत येईल. जिणें तुलाही चांगली चाल शिकविली त्या तुझ्या आईकडे हे मी पाठवीन. विठू- तुह्मी मला असे सांगतां ह्मणून मी घेईन, आ. णि हे पाहून माझे आईस ही भारी आनंद होईल. परंतु मजवर एवढा एक उपकार करा की उमाकां- ताकडून त्याचे त्यास ठेववा. माध०-बरें तर हे दोघांस वांटून देतो, आणि ह्या ब•