पान:बाळमित्र भाग २.pdf/२६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. चढून जात. जसे कोणी हाणेल की, हा कोणी मोठा लढाई खेळणारा पुरातन शूर आहे. मधूनमधून जेव्हां लढाईच्या गोष्टी निघत तेव्हां त्यास अधिक अधिक शौर्याचा आवेश येई. मग आपल्या बापास ह्मणाला, मी जर तुह्मांइतका मोठा असतो तर लढाई खेळावया• स फार आनंदाने निघतों, मग मलाही वाहवा मिळती. शरख०- तूं अशा नाशकारक आणि दुःखकारक कामाची इच्छा कां करितोस ? ते तुला माहात तरी आहे. रुस्तु०- पण, बाबा, तं मला शिपाई करणार आ सना शेख०- होय, तूं ह्मणतोस ती गोष्ट खरीच, रुस्तु-पण शिपायाची चहा तरी पुष्कळ आहे शेव०- चहा आहे खरी, हे मी जाणतो, पण असे आहे; जसें मनुष्याचे शरीर तसाच राजाचा मुलूख, ह्या दोहोंला आतल्या बाहेरल्या रोगांची पीडा सा- रखीच आहे. पहा ! पोटांत कांहीं रोग उत्पन्न न व्हावा व बाहेरून थंडी वारा किंवा घाव गळं व- गैरे ह्यांकडून शरीराचा नाश न व्हावा ह्मणून वै- द्याचा आश्रय करावा लागतो, त्याच न्यायक- रून मुलखाला आंतील रोग, मणजे फंद फितूर, आणि बाहेरील रोग झणजे शत्रु, ह्यांच्या बंदो. बस्ताकरितां शिपाई ठेवावे लागतात. रुस्तु०- तर मग, बाबा, शिपाईलोकांची गरज फार