पान:बाळमित्र भाग २.pdf/२६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. लढाईस उभे राहतील, आणि कदाचित ते मादो घ्यावयास जरी यत्न करतील तरी ते चांगले की काय ? रुस्तु०- त्यांनी तसे केले तर ह्यांत आश्चर्य काय । शेरब.- असे झाले असतां मग मला किती दुःख उ. त्पन्न होईल बरें: मला आपला माल सांभाळावया- स किती खबरदारी ठेविली पाहिजे . शेवटी त्याचा परिणाम कसा तो पहा: जर मी जितलो तर ते सर्व मला एखादे वेळेस पेंचांत आणावयास जपत राहतील, बरें, मी जर हरलो तर ते सर्व मिळून मला लुटून घेतील. रुस्तु०- लढाईचे अगोदर अशी फौज तयार करून ठेवावी की आपण प्रतिज्ञेनें शत्रूस जिवूच जिंकू. शेख०- तूं ह्मणतोस ते खरे, पण शत्रूनेच मजपेक्षा चांगली फौज बाळगून उलटी माझीच दुर्दशा केली तर मग कसे होईल ? आतां मीच तुला बोलण्यां. त थकविले. तुझ्या बोलण्याप्रमाणे जरी माझा जय होऊन मुलूख वाढला तरी तुझे बोलणे माझे नाशास कारण होईलच. रुस्तु०- असे कसे ह्मणतां, बाबा ९ जसा जसा मुलूख वाढेल, तसे तसे द्रव्यही अधिक मिळेल. शेख०- तसे नव्हे, बेग, मुलखाचा मोठेपणा किंवा लहानपणा हा कांहीं द्रव्य अधिक मिळण्यास कारण नव्हे. त्याचे मुख्य कारण मुलखाची आ.