पान:बाळमित्र भाग २.pdf/२६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भातुकली. २६५ वादानी राखणे हे आहे. रुस्तु०- शत्रूपासून घेतलेल्या मुलखाची लावणी क- रता येणार नाही की काय ९ लावणी करावयास काय कठीण आहे ? शेख- कठीण नाही खरे, पण लढाईच्या भयाने कां. ही लोक परागंदा होतील, व बखेड्यामुळे किती. एक परमुलखांत उठून जातील. मग मुलखाची लावणी होऊन आबादानी कशी राहील १ आणि बाकीचे जे रयतलोक शेतकरी राहतील त्यांपासून खबरदारी ठेवणारे लोकांच्या खर्चासाठी वसूल अ- धिक घ्यावा लागेल; ह्यामुळे कुणब्यांचे बैलढोर सारे विकावे लागेल, तेव्हां त्रासून त्यांस दुसऱ्या मुलखांत जाणे प्राप्त पडेल; आणि जुलमामुळे हैं राज्य कधी बुडेल असें देवापाशी ते मागतील, व जागी जागी बंडे माततील रुस्तु०- खरी गोष्ट, बाबा, असें म्यां फारवेळां बखरी- त वाचले आहे. शेख०- तर, पहा, मज भोंवताली जो राजाचा मुलूख आहे त्यांतील लोकांवर काही जुलूम नकरितां स- वदागिरी अशी करीन की, जेणेकरून त्यांचे व माझें हित होईल. तंट्या बखेड्यांत व फंदफितूरां. त नपडतां जपून वागलों, व व्यापार वाढवून सर्व लोक सुखी केले तर रावपणाचे बढाईने जे सुख २३