पान:बाळमित्र भाग २.pdf/२७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६६ बाळमित्र. मिळायाचे त्यापेक्षा अशा कामाने अधिक मिळणार नाही की काय१राजा फारवाढू लागला तर शक्ति हीन होतो, कारण मुलखाची खराबी फार होते. रुस्तु०-पण, बाबा, तुहीं आतांच सांगितले की, रा- जाचा मुलूख व शरीर एक सारखेच आहे, तर ज- स जसें शरीर वाढते तसतशी शक्ति अधिक येती, ह्या न्यायाने जसजसा मुलूख वाढेल तसतसा राजाही शक्तिमान व्हावा की नाही ? शेख.- तूं ह्मणतोस ते ठीकच आहे. शरीराप्रमाणे दि. वसें दिवस राजा वाढत गेला तर बरेंच आहे, प. रंतु तसे होत नाही. रुस्तु०- मला ह्या शेवटल्या गोष्टीचा अर्थ उघड क. रून सांगा. शेख०- मी आतां एके दाखल्यावरून तुझ्या मनांत - भरवितों, ऐक. एक मुलगा व एक मुलगी ह्या दो- घांमध्ये कशी गोष्ट झाली ती पहा! रुस्तु०- येथे मुलगामुलगीचे काय कारण आहे ? शेख.- अरे, दृष्टांतासाठी सांगतो. एक्या बायकोस एक मुलगा व एक मुलगी होती; त्यांत मुलगी अंमळ लहान होती व मुलगा अंमळ मोठा होता; त्यांचे आईने एके दिवशी दोघांस भाकर सारखीच दिली, तेव्हां त्या मुलाने मुलीची भाकर हिसका. वून घेतली. हा अन्याय त्याने कां केला बरें? रुस्तु.- त्याचे मनांत आले असेल की, बहीण मज-