पान:बाळमित्र भाग २.pdf/२७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. मिळविलेलें जें द्रव्य तें पिढोपिढी राहून त्यापासून पुण्य जोडते. राज्यांत बखेडा वगैरे उपद्रव नस- ल्याने रयतेवर जुलूम होत नाही, ह्मणून आबादी असते; कारण की व्यापारी व कसबी व गुणी ह्यांची चहा राजास असती, ह्यामुळे त्यांस जें द्रव्य मिळते ते शेतकरी लोकांकडे पुन: येते. अशा द्र. व्याच्या फिरण्याने सर्व लोक सुखी असतात. हे पाहून दुसरे राज्यांतील रयत लोक ह्या मुलखा- ची प्रशंसा करितात, व आपला मुलख सोडून इ. कडे येतात, तेव्हां जिकडे तिकडे आबादानी व आनंद होतो. सर्व मुखी असल्याने अधर्म बुडून राजास मुख मिळते, मग राजाने इतकेंच मात्र रा. खावें की कोठे अन्याय होऊ देऊ नये. रुस्तु.- तुमचे बोलण्याचे हांशील मला समजलें, प. ण लढाई कोठेच नसली तर मग शिपायाची गरज काय आहे ५ मी तर शिपाई होईन ह्मणतों, तो अ. गोदरच फौजेस फांटा होईल. शेख०- अरे थांब, थांब, रुस्तुमा ! इतक्यांतच तर्क बांधू नको; अरे,जर अगदीच फौज नसली तर दु- सऱ्या राजास वर्तमान कळून तो लागलाच चढाई करून येईल, आणि राज्य घेऊन मुलखाची खरा. बी करील. याजकरितां जरी सल्ला आहे तरी ने. हमी फौज बाळगून पोसली पाहिजे, ह्मणजे तीतील शिपाई लोक समयास प्राण देतील; नाही तर को.