पान:बाळमित्र भाग २.pdf/२७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७२ बाळमित्र. आचरण करून जे दुसरे कोणी दुर्गुणी असतील न्यांसही सद्गुण शिकवील. असेच राजपुत्रही सर्व- गुण संपन्न असावे, ह्मणने जसा राजा तशा प्रजा होतात. दयावंत व नीतिमंत जे राजे आणि ज्या प्रजा आहेत त्यांस सर्वदा आनंद मिळतो, व कोण- त्या ही गोष्टीचे संकट पडत नाही मग असें होतें की त्या राजाचे प्रजेचा कित्ता इतर राज्याच्या प्र. जेनें घ्यावा. ह्यास्तव तूं आतां माझी शिक्षा ऐकून सर्वांभूती दया करीत जा, आणि पुढे आपले पुत्रांस ही असेंच शिकीव, येणेकरून मला आणि तुला- ही फार आनंद होईल. भागीरथी. भागी०- ( आपले बाहुलीशी बोलते.) कांगे, तूं म. जकडे पाहत नाहींस १ आणि आपली मान कां उ. चलीत नाहीस १ मी चांगली थोपडून तुला निज- विते, तरी आपण इकडे तिकडेच डोके हालविते. आज तुला झाले तरी काय ९ जा बाई, मला ना. ही असें आवडणार. आतां तूं मला रागें भरवितेस, तर खबरदार, मघां जशी आई कुत्र्यास मारतांना पाहून रागें भरली तशी मीही तुजवर रागें भरेन, आई- (हे शेवटचे शब्द ऐकून आंत येऊन बोलते.)