पान:बाळमित्र भाग २.pdf/२७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भागीरथी. २७३ काय झालें : माझे बयेला कोणी रागें भरविलें । तूं अशी कां खिन्न झालीस १ काय, ही बाहुली तुझे ऐकत नाहीं भागी०- मी हिला रोज शिकविते की, बाई, आपण आपले हातपाय आवरून राहावें, तर ते तिच्या कांहींच गांवी नाही, काय करावे आई- अशी चांगली बुद्धि तूं तिला शिकवीत अस- तां तिचे गांवींच नाही तर तुझें शिकविणे व्यर्थ झाले खरे, ह्मणून तुला खेद वाटला ९ असो, पण तूं आतां कायशी रागाची गोष्ट बोललीस असें वाटते. भागी०- नाही, नाहीं, आई, मी हिला अंमळ उ- गीच जाचीत होते इतकेंच. त्वां माझें सारे बोलणे ऐकले वाटते. आई- ते म्यां कांहीं ऐकिलें नाही, पण तूं तिला काय ह्मणत होतीस ते सांग, एवढीशी लहान गो- ष्ट मला सांगितल्यावांचून तूं गुप्त ठेवणार नाहीस, अशी माझी खातरी आहे. भागी०- खरेंच आहे. लहान मुलांनी कोणतीही गो- ष्ट आईस सांगितल्या वांचून चोरून ठेवू नये, हे मला ठाऊक आहे. आई- बेटा, खरेंच बोललीस, सांग तर आतां, तूं बाहुलीशी काय काय बोललीस, ते सर्व सांग मला ऐकू दे.