पान:बाळमित्र भाग २.pdf/२७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७४ बाळमित्र. भागी०- सांगते, ऐक. मघां मी हिला अंमळ डोके नीट ठेवावयास सांगितलें तें हिने माझें ऐकिलें नाहीं, ह्मणून हिला मी झटले की, जर नऐकशी- ल तर जशी मला कुत्र्यास मारतांना पाहून आई रागें भरली तशी मीही तुजवर रागें भरेन, इतकेंच मात्र हटलें. आई-एकून तुला वाटले की, मी तुजवर रागें भरलें। भागी०- तसे नव्हे, जेव्हां मी तुझे तोंडाकडेस पाहि. लें तेव्हां तुझ्या मुखश्रीवरून मला वाटले की तु. ला राग आला. आई- मला काही राग आला नाहीं, बरें: तूं एखा- दी कुत्र्यास निर्दयपणाने मारावयास जाशील आ. णि तो तुला चावेल, ह्मणून मला भय वाटले. ह्या मुळे मी तुला बोलले, ही शिकवणीची गोष्ट तुला सांगितली ह्मणून काय राग आला असें झालें! आणि तूं माझें सांगणे ऐकत नाहीस असें मला वाटले, हणून जे मला दुःव झालें तेणेकरून मा. झ्या डोळ्यांवाटे पाणी येऊ लागले, ते पाहून तुला वाटले की आईस राग आला; पण तसे कसे होईल . भागी०- पण, आई मी आतां बाहुलीशी बोलत हो- तें तें ऐकून तूं रागे भरलीस ना? आई- बाहुलीची गोष्ट असूंदे, ते काय, पण तूं आ- रशांत पाहून नटत मुरडत होतीस न्याविषयी कां.